Thursday 16 May 2013

डिस्क डी-फ्रँगमेंट करणे

हि सुविधा विंडोज XP,व्हिस्टा तसेच विंडोज ७साठी हि आहे.
जर आपली सिस्टीम विंडोज असेल तर जवळपास  महिन्याने आपली हार्ड डिस्क डी-फ्रँगमेंट करावी.
फ्रँगमेंट याचा अर्थ असा कि जेंव्हा आपण फाईल तयार करतो किंवा पेस्ट करतो तेंव्हा त्या फाईल या डाटा रुपाने हार्डडिस्क च्या मेमरी लोकेशन वर लोड होतात.ओळीने हा डाटा डिस्कमध्ये लोड केला जातो.
जेंव्हा आपण फाईल कट डिलीट करतो तेंव्हा हा या फाईलची जागा रिकामी तयार होते.व जर नवीन पुढची फाईल जर त्या जागेत बसत नसेल तर ती फाईल डिस्क ची पुढची जागा वापरते व अशा रीतीने डिस्क मध्ये बऱ्याच छोट्या छोट्या जागा मोकळ्या राहतात यामुळे ऑपरेटिंग सिस्टिमला हवा तो डाटा लवकर मिळत नाही तसेच डिस्क मधील हि जागा तशीच मोकळी राहते.
डी-फ्रँगमेंट प्रोसेस नंतर सर्व हार्डडिस्क मधील फाईलची परत व्यवस्थितपणे अरेंजमेंट होते व डिस्क मधील न वापरली जाणारी रिकामी जागा नाहीशी होऊन वापरता जेण्याजोगी जागा वाढते.
यासाठी पुढीलप्रमाणे प्रोसेस करावी.
1]माय कॉम्पुटर ओपन करावे.
2]डिस्क ड्राइव्हवर राईट किल्क करावे.
3]प्रोपर्टी ऑप्शन निवडावा.
4]टूल या पर्यायावर जावे.

5]डी-फ्रँगमेंट नाऊवर क्लिक करावे.
६]डिस्क डी-फ्रँगमेंट विंडो मध्ये ड्राइव्ह सिलेक्ट करा.
७]डी-फ्रँगमेंट ऑप्शन्स वर क्लिक करून डी-फ्रँगमेंट सुरु करावे.
अशा तऱ्हेने सर्व डिस्क ड्राइव्ह डी-फ्रँगमेंट करणे.
अशा सोप्या पद्धतीने आपण आपल्या कॉम्पुटरवर स्पीड वाढवण्यासाठी प्रथमोपचार नक्कीच करू शकता व याने कम्पुटरला कोणतेच नुकसान होण्याचा धोका नाही व यानंतर आपल्या संगणकाचा स्पीड नक्कीच वाढेल.
या सध्या व सोप्या पद्धतीने आपण आपला संगणक टकटकीत ठेवू शकता.मग वाट कसली बघताय सुरु करा कॉम्पुटर क्लीन अप आणि रुपांतर करा आपल्या मंद कॉम्पुटरचे  जास्त फास्ट आणि जास्त स्पेस असणारया कॉम्पुटर मध्ये…
आपणस काही शंका किंवा प्राब्लेम आल्यास नक्की कळवा..मी आहेच मदतीला.. :)

No comments:

Post a Comment