Thursday 16 May 2013

कॉम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी कॉम्पुटर क्लीनअप कसा करावा ?

आपला संगणक स्लो झाला कि सगळ्यांनाच डोक्याला ताप होतो.मग पर्याय एकाच असतो कि कॉम्पुटर क्लीन करणे.तशा कॉम्पुटरवर क्लीन करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत.
त्यातील काही सोप्या व खात्रीशीरपणे कॉम्पुटर क्लीन अप करणाऱ्या दोन पद्धती खाली देत आहे.या प्रोसेस केल्यावर कॉम्पुटर नक्कीच फास्टर झालेला आपल्याला जाणवेल. 
१]डिस्क क्लीन अप करणे.
आपला कॉम्प्युटर बरंच काळ वापरला तसेच नवीन नवीन अप्लिकेशन इन्स्टॉल केले व री सायकल बिन मधील डाटा व टेम्पररी फाईल्स वेळचे वेळीस डिलीट केल्या नाहीत तर संगणकात बिनकामाच्या फाईल्सची संख्या वाढून कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
असे होऊ नये म्हणून काही प्रथोमाचार पद्धती मधील एक म्हणजे ठराविक वेळानी कॉम्प्युटर मधील सर्व ड्राइव्हचे डिस्क क्लीन अप करणे.
१]प्रथम माय कॉम्प्युटर ओपन करणे.
2]यातील एक ड्राइव्ह डिस्क क्लीनअप साठी निवडावा.
3]त्यावर राईट क्लिक करून प्रोपर्टीवर क्लिक करणे.
 4]त्यानंतर ओ एस प्रोपर्टीमधील डिस्क क्लीनअप या बटणावर क्लिक करावे.
 5]त्यानंतर थोडा वेळ प्रोसेसिंग चालू राहील त्याद्वारे कॉम्प्युटर मधील नको असलेल्या फाईल शोधल्या जातात.

6]अशा फाईल डिस्क क्लीनअप मध्ये दाखवल्या जातील तेथील सर्व चेक बॉक्स वर क्लिक करणे.
7]नंतर ओके या बटणावर किल्क करणे.
याद्वारे नको असलेल्या सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.तसेच री सायकल बिन मधील सुद्धा सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.
याच प्रमाणे सर्व सर्व ड्राइव्हचे डिस्क क्लीन अप करणे.यामुळे आपल्या संगणकाच्या स्पीड मध्ये थोडी तरी वाढ नक्कीच होईल.
हीच प्रोसेस ठराविक कालावधीने करणे त्यामुळे कॉम्पुटर क्लीन राहण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment