Friday 31 January 2014

कॉम्प्युटर मधिल वॉलपेपर कसा बदलावा ?



कॉम्प्युटर सुरु केल्यावर सुरुवातीलाच समोर दिसणाऱ्या चित्राला वॉलपेपर म्हणतात. आपणास जर वॉलपेपर बदलायचा असल्यास समोरच्या स्क्रिनवरील रिकाम्या जागेमध्ये माऊसने राईट क्लिक करुन येणाऱ्या चौकोनातील 'Properties' या बटनावर क्लिक करावे. आता समोर सुरु झालेल्या चौकोनातील वरील मेनुबार मधिल ''Desktop' विभागावर क्लिक करा.





आता समोर मध्यभागी कॉम्प्युटर असेल व त्याच्या स्क्रिनवर तेच मघाचेच वॉलपेपरचे चित्र असेल. ते चित्र बदलण्यासाठी त्या कॉम्प्युटरच्या चित्राखाली असलेल्या 'Background' ह्या नावाखाली एक यादी असेल. त्यातील एक-एक नावावर क्लिक केल्यास आपणास वरील कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर आपल्या कॉम्प्युटर मधिल वेगवेगळे वॉलपेपर्स दिसतील. त्यातील आपणास हवा असलेला वॉलपेपर निवडुन खालिल 'OK' ह्या बटनावर क्लिक केल्यास ते चित्र मुख्य स्क्रिनवर येते. अशाप्रकारे आता ते चित्र नेहमी कॉम्प्युटरवर समोर दिसेल.
पुन्हा जर कधी आपणास तो वॉलपेपर बदलायचा असेल तेव्हा परत वर सांगितल्या प्रमाणे निराळ्या वॉलपेपर आणावा.
तसेच यादीमध्ये नसलेले परंतु कॉम्प्युटरमधिल एखादे दुसरे चित्र जर आपणास वॉलपेपर आणायचे असल्यास त्याच यादीच्या शेजारी असलेल्या 'Browse' या बटणावर क्लिक करावे व येथुन आपणास हवे असलेले चित्र जेथे असेल तेथे जाऊन त्याला सिलेक्ट करावे व 'OK' केल्यास ते चित्र वॉलपेपरवर येते.

No comments:

Post a Comment